Saturday, October 21, 2023

 

 

                                                                मराठी भाषा गौरव दिन 

 


इस्माईल युसूफ महाविद्यालय : एक विहंगावलोकन 

 

            मराठी भाषेची प्रशस्ति

              मराठी भाषा आमुची जोरदार खाशी !

            भले हो जोमदार खाशी !!

            हुरूप देऊनी आम्हां !

            मिळविले वैरी तिने धुळीशी

            पूर्णत्वाला संस्कृत भाषा गेली तितुन

            उच्चाराच्या सुलभपणास्तव प्राकृत जन्मुन

            तीहुन सोप्या उच्चाराची परी आवेशाची

            निघे मराठी प्रशस्त भाषा महारठ्याची !! 

                                                 महात्मा जोतिबा फुले

ज्ञांनियाची कुणी काढा बरे तीट

मराठीचा थाटा संसार हो नीट

अमृताते पुन्हा पैंज मी लावीन

थोर भल्या भल्या क्षणांत जिंकीन 

                                            नारायण सुर्वे

हे पुण्यपावन मराठी !

आइकती आदरें कर्णपुटी !

तेयासी  कव्हनी न पडें कामाठी !

संसाराची !!                           कवी नरेंद्र



           






 

मराठी भाषा आणि साहित्य विभाग

वार्षिक अहवाल २०२-

इस्माईल युसूफ महाविद्यालयातील मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२- ह्या वर्षात अनेक अभ्यासपूरक उपक्रम आभासी पध्दतीने राबविण्यात आले. मराठी वाङ्मय मंडळ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करीत असते. मराठी वाङ्मय मंडळातर्फे, दिनांक १४/०१/२०२ ते २८/०१/२०२ ह्या कालावधीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' तसेच दिनांक २७ फेब्रुवारी २०२ रोजी 'मराठी भाषा गौरव दिन ' आभासी पध्दतीने साजरा करण्यात आला.

Ø  मराठी हस्ताक्षर स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दिनांक २१/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले होते.

Ø  मराठी निबंधलेखन स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन शनिवार, दिनांक २२/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे  करण्यात आले होते. प्रस्तुत निबंध स्पर्धेत मराठी भाषेसंदर्भातील विविध विषयांवरील निबंध विद्यार्थ्यांनी लिहिले .

Ø  ग्रंथपरीक्षण स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे आयोजन रविवार, दिनांक २३/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले होते.

Ø  काव्य रसग्रहण स्पर्धा :

मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काव्य रसग्रहण स्पर्धेचे आयोजन सोमवार, दिनांक २४/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले होते. 

Ø  सर्जनशील लेखन स्पर्धा :

     मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील लेखन स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दिनांक २५/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet ह्या माध्यमांद्वारे करण्यात आले होते.

Ø  प्रश्नमंजुषा स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन बुधवार, दिनांक २६/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet आणि  Google Form द्वारे करण्यात आले होते.

Ø  काव्यवाचन:

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन उपक्रमाचे आयोजन गुरुवार, दिनांक २७/०१/२०२ रोजी सकाळी ११. वाजता Google Meet ह्या आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले होते. प्रस्तुत काव्यवाचन उपक्रमात मराठी भाषेतील विविध विषयांवरील कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

Ø  ग्रंथ अभिवाचन स्पर्धा :

     मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ अभिवाचन स्पर्धेचे आयोजन सोमवार, दिनांक ३१/०१/२०२रोजी सकाळी ११. वाजता Google Meet ह्या आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले होते. प्रस्तुत ग्रंथ अभिवाचन स्पर्धेकॉ. गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे वाचन विद्यार्थ्यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित सर्व स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद नोंदवला. 

Ø  मराठी विभाग (कनिष्ठ महाविद्यालय) :

          महाविद्यालयात कनिष्ठ विभागातील शिक्षिका प्रा.लाजवंती चव्हाण ह्यांच्या पुढाकाराने कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध प्रसंगांच्या अनुषंगाने पारिभाषिक शब्द स्पर्धा, काव्यलेखन स्पर्धा, भाषांतर स्पर्धा, भेटकार्ड स्पर्धा, निबंध स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विभागात विद्यार्थ्यांसाठी जागतिक भाषांतर दिन, महात्मा गांधी जयंती, जागतिक टपाल दिन, शिक्षक दिन, वाचन प्रेरणा दिन, दिवाळी, नववर्ष आदी दिवस दूरदृश्यप्रणालीद्वारे साजरे करण्यात आले.  

Ø  मराठी भाषा गौरव दिन :

मराठी विभागातर्फे रविवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२ रोजी कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त  मराठी भाषा गौरव दिनाचे  आयोजन आभासी पध्दतीने करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.प्रमोद शंकर पवार,(प्रमुख समन्वयक (मराठी), मानव्यविद्या आणि सामाजिकशास्त्रे विभाग,यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक) ह्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ.होमी भाभा स्टेट विद्यापीठाच्या कुलगुरू आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्वाती वाव्हळ ह्यांनी भूषविले. ह्याप्रसंगी मराठी भाषा संवर्धन आणि कवी कुसुमाग्रज ह्यांच्याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले.प्रमुख वक्त्यांनी तंत्रस्नेही मराठी भाषा या विषयावर व्याख्यान दिले. ह्याप्रसंगी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांची घोषणा करण्यात ली. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा.प्रा.समीर वैरागी ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती वंदना, कुसुमाग्रजांवरील महितीपटाचे सादरीकरण करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी मराठी अभिमान गीताचे गायन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांची आवर्जून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागातील विद्यार्थ्यांचे साहाय्य लाभले.

सहा.प्रा. समीर रामचंद्र वैरागी

   मराठी विभाग प्रमुख