Saturday, October 21, 2023

                                                           मराठी भाषा आणि साहित्य विभाग

वार्षिक अहवाल २०२०-२१

इस्माईल युसूफ महाविद्यालयातील मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ह्या कोरोना महामारीच्या वर्षात अनेक अभ्यासपूरक उपक्रम आभासी पध्दतीने राबविण्यात आले. मराठी वाङ्मय मंडळ दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि उपक्रमांचे आयोजन करीत असते. मराठी वाङ्मय मंडळातर्फे, दिनांक १४/०१/२०२ ते २८/०१/२०२ ह्या कालावधीत 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' तसेच दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजी 'मराठी भाषा गौरव दिन ' आभासी पध्दतीने साजरा करण्यात आला.

Ø  मराठी हस्ताक्षर स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मराठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन मंगळवार, दिनांक /०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet द्वारे करण्यात आले होते.

Ø  मराठी निबंधलेखन स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन बुधवार, दिनांक ०/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet द्वारे करण्यात आले होते. प्रस्तुत निबंध स्पर्धेत मराठी भाषेसंदर्भातील विविध विषयांवरील निबंध विद्यार्थ्यांनी लिहिले .

Ø  ग्रंथपरीक्षण स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ परीक्षण स्पर्धेचे आयोजन गुरुवार, दिनांक १/०१/२०२रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet द्वारे करण्यात आले होते.

Ø  काव्य रसग्रहण स्पर्धा :

मराठी भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काव्य रसग्रहण स्पर्धेचे आयोजन शुक्रवार, दिनांक २२/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet द्वारे करण्यात आले होते. 

Ø  सर्जनशील लेखन स्पर्धा :

     मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सर्जनशील लेखन स्पर्धेचे आयोजन शनिवार, दिनांक २३/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet द्वारे करण्यात आले होते.

Ø  प्रश्नमंजुषा स्पर्धा :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन रविवार, दिनांक २४/०१/२०२ रोजी सकाळी ०९.३० वाजता Google Meet आणि  Google Form ह्या माध्यमाद्वारे करण्यात आले होते.

Ø  काव्यवाचन :

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन उपक्रमाचे आयोजन सोमवार, दिनांक ५/०१/२०२रोजी सकाळी ११. वाजता Google Meet ह्या आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले होते. प्रस्तुत काव्यवाचन उपक्रमात मराठी भाषेतील विविध विषयांवरील कविता विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळातर्फे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित सर्व स्पर्धा आणि उपक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद नोंदवला. 

Ø  संकेत संपर्क सत्र (वेबिनार) :  

     इस्माईल युसूफ महाविद्यालयातर्फे आयोजित साहित्य आणि इतर मानव्यविद्या शाखांमधील आंतरसंबंध ह्या विषयावरील वेबिनारमध्ये मराठी विषयांतर्गत साहित्य आणि तत्त्वज्ञान:एक अनुबंध ह्या विषयावर आयोजित सत्राचे समन्वयन आणि संयोजन मराठी विभागातर्फे मंगळवार, दिनांक २३ जून २०२० रोजी करण्यात आले. ह्या सत्राला प्रमुख वक्ते म्हणून प्रा.ज्ञानेश्वर भोसले ह्यांचे मार्गदर्शन लाभले.  

Ø  मराठी भाषा गौरव दिन :

मराठी विभागातर्फे शनिवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२ रोजी कवी कुसुमाग्रज जयंतीनिमित्त  मराठी भाषा गौरव दिनाचे  आयोजन आभासी पध्दतीने करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नामदेव गपाटे {सहायक प्राध्यापक(मराठी), बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी} ह्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. माधुरी जोशी(हिंदी विभाग प्रमुख) ह्यांनी भूषविले. ह्याप्रसंगी मराठी भाषा संवर्धन आणि कवी कुसुमाग्रज ह्यांच्याबद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. ह्याप्रसंगी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांची घोषणा करण्यात आली. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक डॉ. एकनाथ फुटाणे ह्यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहा.प्रा.समीर वैरागी ह्यांनी केले. ह्या कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती वंदना, कुसुमाग्रजांवरील महितीपटाचे सादरीकरण करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी मराठी अभिमान गीताचे गायन करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांची आवर्जून ऑनलाइन उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मराठी विभागातील विद्यार्थ्यांचे साहाय्य लाभले.

  

  सहा.प्रा. समीर रामचंद्र वैरागी

                                                                                                        मराठी विभाग प्रमुख


 

No comments:

Post a Comment